संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई, दि-23 : थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री संजय राठोड, आमदार रविंद्र फाटक, सामान्य प्रशासन विभागाच्या (रचना) सचिव अंशु सिन्हा यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
No comments:
Post a Comment