मित्रानो हे आहेत,डॉ शंकरराव अंदनकर,हृदयरोग तज्ञ ( 79 yr ).माजी सैनिकांचे सेवक
…...मागील वर्षी तथाकथीत प्रेम दिनाला पुलवामा आतंकी हल्ल्यात किमान 45 सैनिक शाहिद झाले सारा देश त्यावेळी दुःखसागरात बुडाला.ही घटना डॉ अंदनकर यांना विचलित करुन गेली आणि त्यानी संकल्प केला की शहिदांच्या व माजी सैनिकांच्या परिवार साठी काही केले पाहिजे....ही भावना त्यानी मला बोलून दाखवली.त्या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी मी जिल्हा सैनिककार्यालय गाठले,तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि डॉ साहेब सेवा देऊ इच्छितात सांगितले.चर्चेअंती योजना आखण्यात आली.जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांना मोफत तपासणी,मोफत सल्ला देण्याचे ठरले,आज डॉ शंकरराव अंदनकर माजी सैनिकांच्या परिवाराला ecg, xray, रक्त तपासणी सेवा मोफत उपलब्ध करून देत आहेत हेच नाहीतर सिटी स्कॅन साठी 50 % सूट देखील ते मिळून देतात.या सेवे साठी माजी सैनिकांची संघटना एक फॅमिली कार्ड देते,ते घेऊन आल्यावर या योजनेचा लाभ सैनिकांच्या परिवाराला घेता येतो.…..जिल्ह्यातील किमान 1800 माजी सैनिकांचे कुटुंब याचा लाभ घेत आहेत.
आज महाशिवरात्री, याच दिवशी मागील ( 2019)वर्षी माझी भेट डॉ अंदनकर यांचे सोबत झाली होती आणि आज ( 21 फर .) ला पुन्हा त्यांची भेट घेतली डॉ साहेब समाधानी दिसले .
किसींकी मुस्काराहटो पे हो निसार...
किसिका दर्द मिल सके तो ले उधार....
किसिके वास्ते तेरे दिल मे प्यार...
जिना इसी का नाम हैं....
या गिताची आठवण झाली....
माझ्या थोड्या सहकार्याने आम्ही ही सेवा सुरू करू शकलो...….याचा सार्थ अभिमान आहे.
Thanks डॉ अंदनकर सर
.....एक phone करून त्यांचा उत्साह वाढवू या
No comments:
Post a Comment