LEADING NEWSPAPER AND DIGITAL WEB PORTAL

Saturday, October 24, 2020

मागील 24 तासात 197 नवीन कोरोना बाधितन्ची नोंद, corona

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 24 ऑक्टोबर रोजी 14584 झाली आहे. गेल्या 24 तासात 197 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 11439 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

सध्या जिल्ह्यामध्ये 2928 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 11439 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 205 सह एकूण 217 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.