*ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....*
आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"
"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.
"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."
"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"
"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."
"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"
"मिरजलाच घेऊन जावी लागेल."
त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात.
"वकिलसाहेब, गाडी बँकेनं ओढून नेली होय?" त्यानं विचारलं.
"कोण म्हटलं?"
"नाही, गावात कोणतरी म्हणत होतं."
तासाभरात दुसरा मनुष्य. "वकिलसाहेब, किती हप्ते तटले होते हो?...हप्ते भरता येत नव्हते तर गाडीच घ्यायची नव्हती !"
असेच मग दिवसभर लोक येत राहिले आणि प्रश्न विचारत राहिले.
दिवसभरात एकानंही," गाडीला काय झालं?" किंवा "गाडी कुठं गेली?" म्हणून विचारलं नाही. सगळे जण असे बोलत होते की जणू गाडी बँकेनंच ओढून नेलीय.
मला सकाळी सकाळी या प्रश्नांचा राग आला होता पण नंतर नंतर लोकांच्या हलक्या कानाचं आणि सुमार बुद्धीचं हसू यायला लागलं.
दुपारनंतर तर आमचा संवाद असा होऊ लागला,
"वकिलसाहेब, बँकेनं गाडी
No comments:
Post a Comment