LEADING NEWSPAPER AND DIGITAL WEB PORTAL

Tuesday, February 25, 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक : हंसराज अहीर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्त आज भाजपा चंद्रपूर महानगर द्वारा आयोजित  धरणे आंदोलना मध्ये मा हंसराज जी अहीर यांनी  सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलना मध्ये सहभागी झाले होते. महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नसून त्याचबरोबर अतिवृष्टी ने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा हवेत विरले आहे, फक्त आश्वासनांचे गाजर दिल्याने जनता त्यांना धडा शिकवेल आणि भाजपा सदैव जनतेच्या पाठीशी असून राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजपा करत आहे असे वक्तव्य मा हंसराज अहीर यांनी आंदोलनाला संबोधित करताना केले.

No comments:

Post a Comment

पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी Accident Tadoba

पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी चंद्रपूर , 1दिसम्बर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम ...