चन्द्रपुर:
चंद्रपूर शहरातील इको प्रो संस्थेने आपल्या 15 वर्षाच्या सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रासह अन्य सेवेत विविध विषयांवर कार्य केले. आता एका नव्या व्यासपीठाकङे पादाक्रांत करीत आहे. चांगला नागरिक घङविण्याच्या दृष्टीने इको-प्रो संस्थेच्या 'शिक्षण विभागा'च्या वतीने जिल्हयातील कानाकोपऱ्यातुन चंद्रपूर शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर आम्ही 'अभ्यासिका' सुरू करीत आहोत.
आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिकायला येत आहे. मात्र, शिकवणी वर्ग, निवास आणि भोजनाचा खर्च भागविताना आर्थिक बाबीचा सामना करावा लागतोय. अशातच खासगी अभ्यासिकांचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे विद्यार्थी खचून जातो. अशा विद्यार्थ्याना धीर देण्यासाठी आम्ही अभ्यासिकेची सुविधा येत्या 1 मार्च 2020 पासून उपलब्ध करून देत आहोत.
No comments:
Post a Comment