LEADING NEWSPAPER AND DIGITAL WEB PORTAL

Saturday, February 29, 2020

गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना : विजय वडेट्टीवार


पालकमंत्री यांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

जिल्हाधिकारी यांनी केली शिवभोजन थाळीची तपासणी

चंद्रपूर,दि. 29 फेब्रुवारी : राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी मयूर स्नॅक सेंटर या शिवभोजन केंद्रामध्ये जावून शिव भोजनाचा आस्वाद घेतला.

यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार,नगरसेवक नंदू नागरकर, अॅड. राम मेश्राम, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.

गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना आहे, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले. शिवभोजन योजनेच्या प्रतिसादानुसार व उत्तम   नियोजनाला बघून भविष्यात आणखी अतिरिक्त थाळींची व शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी सांगितले. यावेळी भोजनालयात उपस्थित ग्राहकांशी संवाद साधून पालकमंत्र्यांनी त्यांना याचा व्यवस्थित लाभ मिळतो काय? याची चौकशी केली.

जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी यावेळी शिवभोजन थाळीची गुणवत्ता तसेच नियमाप्रमाणे थाळीमध्ये आहार मिळतो की नाही यासंदर्भात तपासणी केली. जिल्हाधिकारी डॉ. खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी देखील यावेळी पालकमंत्र्यांसमवेत शिवभोजन थालीचा आस्वाद घेतला. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हे वितरण होत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना शिवभोजना संदर्भात विशिष्ट ऍपची माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये मयूर स्नॅक्स सेंटर बस स्टॅन्ड जवळ, वैष्णवी रेस्टॉरंट अँड भोजनालय सरकारी रुग्णालय जवळ, विशाखा महिला बचत गंज वार्ड येथे शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. या तीनही केंद्राला दिवसाला 350 शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत 11839 थाळीचे वाटप झालेले आहे.

शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment